

Maharashtra Winter Session 2026
esakal
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूरमध्ये होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत कडक निर्देश दिले आहेत. अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडावे आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना वेळेत उत्तरे मिळावीत, यासाठी संसदीय कार्य विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.