Winter session : नेत्यांची अशीही 'सोय'! आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी असणार आता विशेष 'टॉयलेट'

हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाल्यापासून विरोधक सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी
Winter session
Winter sessionEsakal
Updated on

हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाल्यापासून विरोधक सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसून येत आहे. सुरवातीला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, त्यानंतर राज्यातील भूखंड घोटाळा यावरून हिवाळी अधिवेशन गाजत असतानाच नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृहातील एक व्हिडिओ एका आमदाराने ट्विट करत सरकारचा आणि नियोजनकर्त्यांचा भोंगळ कारभार यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूरमधील आमदार निवासामधील एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये आमदार निवासामधील आमदारांच्या कपबश्या धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा कसा वापर केला जातोय. त्याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलाय. त्यांच्या या व्हिडिओमुळे हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अमोल मिटकरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओसोबतच "हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था.#आझादीकाअमृतमहोत्सव" लिहलं आहे. तर आझादी का अमृत महोत्सव हा हॅशटॅग वापरून स्वातंत्र्य भारतातील व्यवस्थेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्यामुळे आता अधिवेशनात गरम चहाच्या सोबतच आमदारांच्या कपबशा धुण्यावरून वाद वाढण्याची शक्यता आहे.

Winter session
Maharashtra Winter Session : कायद्यानुसार आपल्याला अनुदानित शाळा देता येणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

सभागृहामध्ये यावरून वातावरण आणखी तपण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Winter session
Winter Session : महिलांची शोधाशोध संपणार! सार्वजनिक पार्किंगमध्येही आता महिलांसाठी राखीव जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com