Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविले

Maharashtra Shaken by Dual Incidents of Violence Against Women : फलटणमध्ये पोलीस उपनिरीक्षक व घरमालकाच्या मुलाच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या, तर मुंबईत प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या; महिला अत्याचाराच्या दोन घटनांनी महाराष्ट्र हादरला.
Lady Doctor's Suicide Exposes Alleged Rape and Harassment by Police Officer in Phaltan

Lady Doctor's Suicide Exposes Alleged Rape and Harassment by Police Officer in Phaltan

Sakal

Updated on

सातारा- मुंबई : अवघ्या राज्याची मान आज पुन्हा एकदा शरमेने खाली गेली. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असताना खाकी वर्दीवरही डाग लागला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत एका महिला डॉक्टरने गुरुवारी येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक व घरमालकाच्या मुलाने शारीरिक व मानसिक छळ करून बलात्कार केल्याचे तिने हातावर लिहून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. दुसरीकडे मुंबईतील काळाचौकी येथे प्रेयसीची हत्या करून तरुणाने स्वतःला संपविल्याने खळबळ उडाली. या दोन्ही घटनांमुळे राज्यात ‘ती’ असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com