high tide warning for Mumbai coastline : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेकडून यासंदर्भातील अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच मुंबईत पुढचे तीन दिवस उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत छोट्या होड्यांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.