कांदिवली पूर्व ठाकूर विलेज मध्ये एका कारला आग, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी नाही.कार आगीत जळून खाक.छगन भुजबळांची ओबीसी नेत्यांबरोबर बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, माझ्याबद्दल घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी नेते नाराज आहेत, त्यामुळे त्यांनी माझी भेट घेतली, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. .राज्यांतील अनेक भागांमध्ये पाणथळ प्रदेशांची समस्या हे एक मोठे आव्हान आहे. ही समस्या सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालिल महायुतीच्या सरकारने तज्ञांच्या मदतीने एक योजना तयार करणे गरजेचे आहे. तरच क्षारपड जमिनीचा प्रश्न निकाली निघून उपजावू जमिनी टिकणार आहेत. अन्यथा उद्योग, व्यवसाय, कारखाने आदी मुलभत विकासाच्या कारणाने जमिनी कमी होत चालल्या आहेत, त्यात क्षारपड जमीन क्षेत्राची वाढ झाल्यास नजीकच्या काळात वाढत्या लोकसंख्या वाढीस पुरेल इतका अन्न धान्य पूरवठा करण्याचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे..अमृतसर आयुक्तालय पोलिसांनी 10 किलो हेरॉईनसह दोन तस्करांना अटक केली. .दिल्लीतील लोकांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास आहे - मुख्यमंत्री आतिशी.केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी बाबा महाकाल मंदिरात पूजा केली आहे. .पारगाव ता. आंबेगाव येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील प्रमोद ज्ञानेश्वर ढोबळे या तरुणाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे..कल्याण मध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरीची घटना समोर आली आहे. परप्रांतीय व्यक्तीने एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. उत्तम पांडे (वय 40) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला पांडे व त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. .अगरतळ्यातील महत्त्वपूर्ण सहकारी उपक्रमांच्या उद्घाटनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. अमित शहा म्हणाले, "प्रधानमंत्री मोदींनी केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन केले, ज्याचा उद्देश देशभरात सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आणणे आहे. त्यांच्या नेतृत्त्वामुळे भारत आता पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे आणि २०२७ पर्यंत आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे स्थान मिळवू. या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाची आणि राज्यांची सक्रिय सहभागिता आवश्यक आहे. देशाच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत समृद्धी पोहोचवणे, तसेच सर्वांना आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करणे हे आमचे लक्ष्य आहे.".- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत ख्रिसमसच्या उत्सवात सहभागी होणार -कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जातो - कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह पंतप्रधान ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांच्याकडून 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.अभिनेता अल्लू अर्जुनने एक्सवर पोस्ट केली आहे की, "माझ्या सर्व चाहत्यांना नेहमीप्रमाणे त्यांच्या भावना जबाबदारीने व्यक्त करण्याचे आणि ऑनलाइन आणि ऑफलाइन कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा किंवा वर्तन करू नये, असे आवाहन करतो".भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावर दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की मीच पालकमंत्री होणार आहे. आज त्यांचे रायगडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले, तसेच औक्षणही करण्यात आले..महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झाले ते निवडणूक आयोग आणि केंद्रात बसलेल्या साहेबांमुळे सत्तेवर आले आहे. जनादेश चोरून हे सरकार स्थापन झाले आहे. कालच निवडणूक आयोगाने जारी केले की ते आता कोणतीही माहिती देणार नाही, याचा अर्थ असा आहे की काहीतरी वेगळाच आहे...".पीव्ही सिंधू आज तिचा होणारा नवरा वेंकट दत्तासोबत उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवैतमध्ये रत्नागिरीतल्या कामगाराशी मराठीतून संवाद साधला..राम मोहन नायडू किंजरापू यांनी देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन एटीसी टॉवर कम तांत्रिक ब्लॉकचे उद्घाटन केले.त्रिपुरा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धलाई जिल्ह्यातील कुलई आरएफ व्हिलेज ग्राउंड येथे 668.39 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली..परभणीला काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीवर शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "राहुल गांधी खासगी विमानाने परभणीत येत आहेत. ते नांदेडला येणार, परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासोबत असल्याचा दिखावा करतील. माझा प्रश्न आहे, जेव्हा संसदेबाहेर असा वाद होतो, तेव्हा राहुल गांधी बाहेरही येत नाहीत आणि आता खासगी चार्टर घेऊन येथे येत आहेत? लोक या ढोंगीपणाला समजू शकतात. आम्ही परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी व त्यांच्या कुटुंबासोबत पूर्णपणे आहोत, परंतु या प्रकरणावर कधीही राजकारण करणार नाही.".राज ठाकरे यांच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांनीही हजेरी लावली. यावेळी दोघांनी कौंटुंबिक संवाद झाला. .शरद पवार यांनी रविवारी सकाळी पुण्यातील भीमथडी जत्रेस भेट दिली. दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन जत्रेला येण्याचे निमंत्रण दिले आहे. .द्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गाढवाचा वापर केल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत..छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ओबीसी नेत्यांनी बैठक बोलावली आहे. मुंबईतील नरिमन पाॅईंट येथे ही बैठक आज दुपारी होणार आहे. .मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. 34 प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले..पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच वारजे परिसरात गाड्यांची तोडफोडवारजे माळवाडी,गोकुळनगर पठार भागात अनेक चारचाकी गाड्यांच्या काचा फोडण्याचा प्रकारआठ ते दहा गाड्यांची केली तोडफोड वारजे पोलिसाचा तपास सुरू गेले काही दिवसात पुण्यात गाड्या तोडफोडेचे सत्र सुरूच आहे पोलिसांचा वचक आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.पुण्यातील दाट धुक्यामुळे २२ विमानांना उशिराने उड्डाण घ्यावे लागले आहेत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शनिवारी पडलेल्या दाट धुक्याचा सकाळी सहा ते दुपारी १२ दरम्यान २२ विमानांना याचा फटका बसला आहे एवढंच नाही तर पुण्यात येणारे एक विमान दुसऱ्या शहराकडे वळवावे लागले. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.पुण्यातील भोर तालुक्यात रब्बी हंगामातील ई-पिक पाहणीला सुरुवात ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष शेतावरून जाऊन ई पिक पाहणी कशी करायची याविषयी शेतकऱ्यांना करण्यात येतंय मार्गदर्शन..नेमून दिलेल्या साहाय्यकांच्या सहकार्याने, सर्व शेतकऱ्यांनी 15 जानेवारी पर्यंत पिक पाहणी पूर्ण करावी, प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन...पोलिसांनी टेम्पोतून आठ लाख ५८ हजारांचा गुटखा, तसेच टेम्पो असा १८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सौरभ उर्फ धनराज निंबाळकर (थोरवे शाळेसमोर, कात्रज), संग्राम निंबाळकर ( २६) यांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारती विद्यापीठ परिसरातील फालेनगर येथून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.पोलिस पथकाने सापळा लावून टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी करण्यात आली, तेव्हा टेम्पोत गुटख्याचा साठा आढळला. अटक करण्यात आलेले दोघे जण भाऊ असून त्यापैकी एकाविरुद्ध यापूर्वी गु्न्हे दाखल झाले आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत..12 जानेवारीला शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच भाजप रणशिंग फुकणार...भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संदेश... .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.