ambulance service
sakal
पुणे - महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका राज्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. गेल्या ११ वर्षांपासून ‘डायल १०८ रुग्णवाहिका’द्वारे राज्यातील १ कोटी १४ लाख ४७ हजार २९६ रुग्णांना मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास समूह (बीव्हीजी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा राज्यात सुरू आहे.