'यूपीएससी' परीक्षेत महाराष्ट्राची बाजी; 60 हून अधिक मराठी उमेदवार उत्तीर्ण  यंदाही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत य़श

तेजस वाघमारे
Tuesday, 4 August 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) 2019 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल मंगळवारी (ता.4) जाहीर झाला. परिक्षेत अभियांत्रिकी आणि तसेच, पूर्वीदेखील ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. प्रदीप सिंह या उमेदवाराने प्रथम क्रमांक पटकावला.

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) 2019 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल मंगळवारी (ता.4) जाहीर झाला. परिक्षेत अभियांत्रिकी आणि तसेच, पूर्वीदेखील ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. प्रदीप सिंह या उमेदवाराने प्रथम क्रमांक पटकावला. यंदा साठहून अधिक मराठी उमेदवारांनी परीक्षेत यश मिळवले आहे. तर राज्यातून नेहा भोसले हिने देशात 15 वा क्रमांक पटकावला. बीडच्या मंदार पत्की याने 22 वा तर, आशुतोष कुलकर्णी याने 44 वा क्रमांक पटकावला. उल्लेखनीय यश म्हणजे अभियांत्रिकी झाल्यानंतर काही कारणाने दृष्टी गमावलेल्या जयंत मंकले याने 143 वा क्रमांक पटकावत आपले स्वप्न साकारले आहे.  

महामुंबईत आज दिवसभर पावसाचे थैमान; बहुतांश भाग पाण्याखाली; रेड अलर्ट कायम 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर 2019 मध्ये मुख्य परीक्षा घेतली होती. तर, यावर्षी फेब्रुवारी आणि जुलैमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले. या परीक्षेद्वारे एकूण 829 उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस यूपीएससीने केली आहे. 11 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या वेळी म्हणजेच 2019 मध्ये प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कोट्यातून 78 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा, केंद्रीय सेवांमधील गट 'अ' आणि गट 'ब' मधील सेवांमध्ये नियुक्ती दिली जाईल.

ग्रामीण विद्यार्थी सरस
राज्यातील सुमारे 60 हून अधिक मराठी विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले. यामध्ये शहरी भागांतील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. 2020 मधील यूपीएससी परीक्षा 31 मे रोजी पार पडणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा 4 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

शुक्रवारपासून मुंबईतील महाविद्यालये ऑनलाईन सुरु; वाचा सविस्तर

दृष्टीहीन विद्यार्थ्याचे स्वप्न साकार
जयंत मंकले या पुण्याच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांने परीक्षेत 143 वा क्रमांक पटकावला आहे. याआधीही जयंत मंकले याने लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. त्यावेळी जयंतचा 937 वा क्रमांक होता. नंतर दोन वर्ष जिद्दीने अभ्यास करून जयंतने पुन्हा परिक्षा दिली. आधीच्या परिक्षेत यश न मिळाल्यामुळे जयंतला नैराश्य आले होते. परंतू पुन्हा परिक्षा देऊन जयंतने घवघवीत यश मिळवले आहे.
--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra's victory in 'UPSC' exam; More than 60 Marathi candidates have passed this year too

टॉपिकस
Topic Tags: