राज्य सीआयडी परमबीर सिंहांना फरार घोषित करण्याच्या तयारीत ? | Parambir singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

parambir-singh

राज्य सीआयडी परमबीर सिंहांना फरार घोषित करण्याच्या तयारीत ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : खंडणीचे आरोप असणारे मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांना फरार घोषित करण्याची तयारी राज्य सीआयडी (Maharashtra CID) करत आहे. सीआरपीसीच्या (CRPC) कलम 82 आणि 83 नुसार परमबीर सिंहांना फरार घोषित करण्यात येईल. तसंच त्यांची संपत्तीही जप्त (property seized) करण्याची तयारी सीआयडी करत असल्याची माहीती सुत्रांनी दिलीये. तसंच परमबीर सिंहाच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस (Red corner notice) जारी करण्याची सीआयडीनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे (central home ministry) केल्याचीही माहीती मिळतेय.

हेही वाचा: नवी मुंबई : १५ नोव्हेंबरला कोविड योद्ध्यांच्या घरांची सोडत

मे महिन्यापासून आहेत बेपत्ता

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटीच्या खंडणी प्रकरणाशी परमबीर सिंह यांचं प्रकरण जोडलेलं आहे. या प्रकरणाचा तपास महारष्ट्र सरकानं नेमलेला चांदिवाला आयोग करतंय आयोगानं परमबिर सिंह यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले पण परमबिर सिंह एकदाही चौकशीला आले नाहीत. त्यांच्यावर मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये खंडणीची गुन्हाही दाखल करण्यात आलाय, या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी नुकतंच नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या पोलिस अधिकाऱ्यांना अटक केलीये ते दोघंही पोलिस कोठडीत आहेत. मे महिन्यापासुन परमबिर सिंह कुठे आहेत हे पोलिसांनाही माहीत नाही.

अँटेलीया प्रकरणात गेलं होतं पद

अँटेलीयाच्या परिसरात स्फोटकं सापडल्याच्या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर परमबिर सिंह यांच्या विरोधात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना मुंबईच्या आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं होतं.

अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब

आयुक्तपद गेल्यानंतर परमबिर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारं पत्र लिहीलं होतं. त्यात सचिन वाझेला अनिल देशमुख यंनीच हॉटेल्स आणि बारमधून 100 कोटी रुपये घ्यायला सांगितल्याचा उल्लेख होता.

loading image
go to top