
छत्रपती संभाजीनगर: आज देशभरात महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळमध्ये घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सकाळपासूनच शिव शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने गोंधळ उडाल्याचेही पाहायला मिळाले. दर्शनासाठी रांगेत उभे असणाऱ्या तरूणांची जबर हाणामारी झाली. भाविकांनी एकमेंकाना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल माीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.