mahatma jyotiba phule
sakal
Mahatma Phule Jayanti: महात्मा जोतीराव फुले यांची उद्या 200 वी जयंती आहे, यंदाचं वर्ष हे त्यांचं जन्म द्विशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त शासनानं वर्षभरात विविध उपक्रम राबवण्याची घोषणाही केली आहे. पण त्यांच्या विचारसाहित्याचा मात्र शासनाला विसर पडला आहे.
Mahatma Phule Jayanti: महात्मा जोतीराव फुले यांची उद्या 200 वी जयंती आहे, यंदाचं वर्ष हे त्यांचं जन्म द्विशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त शासनानं वर्षभरात विविध उपक्रम राबवण्याची घोषणाही केली आहे. पण त्यांच्या विचारसाहित्याचा मात्र शासनाला विसर पडला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शासकीय ग्रंथगारात पुस्तकच उपबल्ध नसल्यानं आता फुले साहित्यप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्य शासनाच्या चरित्र साधनं प्रकाशन समित्या, साहित्य आणि संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय, विश्वकोश निर्मिती मंडळ आदींच्या माध्यमातून विविध पुस्तकं प्रकाशित करण्यात आली आहेत. महात्मा जोतीराव फुले यांनी स्वतः लिहिलेल्या साहित्याचा समग्र वाड्मय ग्रंथ, महात्मा फुले गौरवग्रंथ, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, कृषी संवादक महात्मा फुले ही पुस्तकेही शासनानं प्रकाशित केली आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पुण्यातील शासकीय ग्रंथागार अर्थात 'फोटोझिंको प्रेस' इथं महात्मा फुलेंसंबंधी एकही पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध नाही.
यासंबंधी वारंवार ग्रंथागारातील कर्मचाऱ्यांकडं पाठपुरावा करून देखील पुस्तकं उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. कर्मचारी देखील त्यांच्या वरिष्ठांकडं सतत पाठपुरावा करत असल्याचं सांगत आहेत. पण शासनाकडून याची गांभीर्यानं दखल घेतली गेल्याचं दिसत नाही. शासन निर्मित पुस्तकांना सततची मागणी असते. मात्र, कायमच पुस्तकांचा तुटवडा असल्याचं चित्र पाहायला मिळतं. ज्या उद्देशानं शासनानं राष्ट्रपुरुषांची आणि इतर पुस्तकांची निर्मिती करून ती विक्रीसाठी उपलब्ध करण्याचं धोरण आखलं आहे, त्याचा स्वतः शासनालाच विसर पडलाय की काय? असं आता म्हणावं लागेल.
शनिवार, ११ एप्रिल २०२६ पासून महात्मा जोतीराव फुले यांचे जन्म द्विशताब्दी वर्ष सुरू होत आहे. सरकार आणि चरित्र साधने प्रकाशन समितीकडून महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दीची पूर्वतयारी म्हणून किमान काही महिने अगोदरच त्यांच्या संबंधीची पुस्तकं छापून विक्रीसाठी उपलब्ध करून देणं आवश्यक होतं. मात्र, असं घडलेलं नाही, त्यामुळं महात्मा फुलेंसंबंधी सरकार, सरकारी यंत्रणा आणि चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य किती जागृत आहेत, हे लक्षात येतं.
राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सतत जयघोष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या महामानवांच्या संबंधीच्या पुस्तकांच्या निर्मितीकडं लक्ष देण्याची गरज आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्यासंबंधीची पुस्तके लवकरात लवकर उपलब्ध करून न दिल्यास फुले साहित्यप्रेमींच्यावतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा विवेकवसा फाऊंडेशनचे संघटक विशाल विमल यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.