वादानंतर महाविकास आघाडी बॅकफूटवर; आदित्य ठाकरेंची भूमिका चर्चेत

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 19 January 2020

आपले मत कळवा
देशासमोर आणि महाराष्ट्रासमोर आर्थिक आव्हाने उभी आहेत. बेरोजगारीचे संकट तरुणाईवर कोसळते आहे. 
अशा वेळी राजकीय नेत्यांनी इतिहासातील भावनिक मुद्द्यांवर राजकारण करावे की वर्तमानातील प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यावेत?
सजग नागरिक म्हणून आपले मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. 

आपले मत नोंदवा - 
esakal.com
fb.com/SakalNews
Twitter.com/SakalMediaNews

सविस्तर प्रतिक्रिया लिहा - webeditor@esakal.com 
अथवा सोशल मीडियावर हॅशटॅग वापरा - #TweetToSakal

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात पाठवायला हवे, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. राज्यात किमान समान कार्यक्रमावर सरकार चालणार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे, तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी इतिहासावर किती बोलणार असे म्हणत महाआघाडीत एकवाक्‍यता असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने मात्र सरकारवर टीका केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेना नेते संजय राऊत यांची वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. शिवाजी महाराजांच्या वंशजांवरील टिप्पणी, इंदिरा गांधी व करीम लाला यांची भेट या मुद्यांवरून त्यांनी वाद निर्माण केला होता.आज, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्यांना ज्या तुरुंगात इंग्रजांनी सावरकरांना ठेवले होते, त्याच अंदमान तुरुंगात पाठवायला हवे, असे वक्तव्य राऊत यांनी केले. यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता दिसताच महाविकास आघाडी नेत्यांनी वादावर पडदा पाडण्याची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर काम करत असल्याचे सांगत काँग्रसने बाजू स्पष्ट केली आहे. सावरकर समजून घेण्यासाठी अंदमानच्या तुरुंगात जाण्याविषयी संजय राऊत यांनी त्यांच्या मित्रपक्षाला सांगावे. इंदिरा गांधी यांच्याविषयीचे वक्‍तव्य मागे घेतल्यानंतर आता सत्तेसाठी त्यांनी सावरकरांवरील प्रेमही मागे घेऊ नये, असा टोला भाजप नेते  आशिष शेलार यांनी मारला आहे.

महाराष्ट्रातील पोलिसांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; प्रत्येक जिल्ह्यात...

इतिहासावर किती बोलणार?
संजय राऊत यांच्या विधानानंतर, ‘इतिहासावर किती दिवस बोलणार?’ असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी हा विषयच अप्रस्तुत असल्याचे मत व्यक्‍त केले. राऊत यांनी व्यक्‍त केलेली भूमिका पक्षाची नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले, तो देश विकास करतोय का, याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. वादातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा. शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे बरे चाललेले आहे, हे पाहून काहींच्या पोटात दुखत आहे. मात्र, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची युती कायम आहे. प्रत्येकाची वेगळी मते असतात, त्यालाच लोकशाही म्हणतात,’ असे आदित्य म्हणाले.

सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्यांना अंदमान तुरुंगात पाठवायला हवे.
- संजय राऊत, शिवसेना नेते

सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी राऊत यांचे मत वैयक्‍तिक आहे. त्यांनी व्यक्‍त केलेली भूमिका पक्षाची नाही. 
- आदित्य ठाकरे, शिवसेना नेते

संजय राऊत यांनी केलेले विधान हे पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, हे शिवसेनेने स्पष्ट करावे.
- अशोक चव्हाण, काँग्रेस नेते

आपले मत कळवा
देशासमोर आणि महाराष्ट्रासमोर आर्थिक आव्हाने उभी आहेत. बेरोजगारीचे संकट तरुणाईवर कोसळते आहे. 
अशा वेळी राजकीय नेत्यांनी इतिहासातील भावनिक मुद्द्यांवर राजकारण करावे की वर्तमानातील प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यावेत?
सजग नागरिक म्हणून आपले मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. 

आपले मत नोंदवा - 
esakal.com
fb.com/SakalNews
Twitter.com/SakalMediaNews

सविस्तर प्रतिक्रिया लिहा - webeditor@esakal.com 
अथवा सोशल मीडियावर हॅशटॅग वापरा - #TweetToSakal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas aghadi backfoot after dispute Aditya Thackeray's role in discussion