माझ्या अनुभवाचा फायदा करून घ्या - अशोक चव्हाण 

मृणालिनी नानिवडेकर /सकाळ न्यूज नेटवर्क 
Saturday, 25 July 2020

वाहिन्यांना काहीतरी हवे असते. त्यामुळे ते चालायचेच. मात्र महाविकास आघाडी सरकार उत्तमप्रकारे चालवायचे असेल तर आघाडीबद्दलचा माझा अनुभव कामाला येऊ शकेल. योग्य वाटल्यास तो घ्यावा,' असेही ते म्हणाले. 

मुंबई -  सरकार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी चालवायचे असते, अधिकाऱ्यांनी नाही, असे सांगत महाविकास आघाडीने माझ्या सरकार चालवण्याच्या अनुभवाचा जरूर फायदा करून घ्यावा, असा सल्ला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. 

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेले अशोक चव्हाण सध्या नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबद्दल त्यांना विचारले असता, "या बातम्या मी वाचतो. वाहिन्यांना काहीतरी हवे असते. त्यामुळे ते चालायचेच. मात्र महाविकास आघाडी सरकार उत्तमप्रकारे चालवायचे असेल तर आघाडीबद्दलचा माझा अनुभव कामाला येऊ शकेल. योग्य वाटल्यास तो घ्यावा,' असेही ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याने अशोक चव्हाणांच्या खात्याचे विभाजन होणार, अशा बातम्या सध्या माध्यमांवर येत आहेत. त्याबद्दल त्यांनी काही बोलण्यास नकार दिला; मात्र सरकार लोकनियुक्त प्रतिनिधी चालवतात ते अधिकाऱ्यांनी चालवू नये, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज नाराजीच्या बातम्यांचा इन्कार करत आम्ही उत्तमरीतीने सरकार चालवू, असे स्पष्ट केले. "सारथी' ही संस्था आमच्या अंतर्गत येत असल्याने ती परत कॉंग्रेसला द्यावी, असे पत्रही मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविकास आघाडी सरकारमध्ये आपले स्थान नगण्य झाले असल्याची भावना कॉंग्रेसमध्ये पसरली आहे. त्यातच दोन माजी मुख्यमंत्री, विदर्भातील नितीन राऊत, नाना पटोले अशी मंडळी आपापले वजन वापरत असल्याने प्रदेशाध्यक्ष थोरात यांना सगळ्यांना सांभाळून घेण्याची कसरत करावी लागते आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi definitely take advantage of my experience  says Ashok Chavan