esakal | ठाकरे सरकारमध्ये सतेज पाटलांना बढती मिळणार? कॅबिनेट मंत्री होणार असल्याची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Satej Patil

ठाकरे सरकारमध्ये सतेज पाटलांना बढती मिळणार?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर : आघाडी सरकारच्या( Mahavikas Aghadi)मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात कॉंग्रेसच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे आणि त्यापैकी एका ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. यासाठी, अनेक मंत्र्यांनी आग्रहही धरला आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह सतेज पाटील यांच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसला दुसरे कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता बळावली आहे. (mahavikas-aghadi-government-cabinet-expansion-possibility-satej-patil-cabinet-minister-uddhav thackeray-akb84)

मंत्रिमंडळाच्या फेरबदलात कॉंग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू मिळणार असून, एका राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळणार असल्याचा अंदाज आहे. यात गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना बढती मिळू शकते. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने एका विद्यमान मंत्र्याला अध्यक्षपदी विराजमान केले जाईल. त्या रिक्त पदावर नवीन तरुणांना संधी दिली जाऊ शकते. यात प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे यांची नावे आघाडीवर आहेत.

हेही वाचा- नर्सेसना मिळणार 2 महिन्याचा पगार ; मंत्री सामंतांचा निर्णय

दरम्यान, पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसकडे बाळासाहेब थोरात वगळता दुसरे कॅबिनेट मंत्रिपद नाही. सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघात केलेल्या दमदार कामगिरीची दखल घेतली जाणार आहे. याशिवाय, ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. त्यांचा ठाकरे सरकारमध्ये पुन्हा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. मात्र, आता त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्याचा विचार आहे. याला मंत्रिमंडळातील अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे.

या फेरबदलात अखिल भारतीय काँग्रेस समितीने नुकतेच सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे. या आधारे हा निर्णय घेण्यात आला. यात आदिवासी विकासमंत्री के. सी. पडवी यांचे नाव घेतले जात आहे. त्यांना मंत्रिपद गमवावे लागले. त्यांचे अध्यक्षपदावर पुनर्वसन होऊ शकते किंवा त्यांना आमदार म्हणूनच राहावे लागेल, असे चित्र आहे. शिवसेनेकडील एक मंत्रिपद रिक्त आहे. माजी मंत्री संजय राठोड यांना एका आत्महत्या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. त्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

loading image