शरद पवार काय करतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही; NCP नेत्याचा BJP आमदाराला टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

शरद पवारांच्या सावलीत सुध्दा उभं राहण्याची ज्यांची लायकी नाही, ते विचारतात शरद पवारांनी काय केलं?

शरद पवार काय करतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही'

दहिवडी (सातारा) : बिजवडी सोसायटीत (Bijwadi Society) पैशाच्या राजकारणाचा सामान्य जनतेने चक्काचूर केला आहे. माणमधील हरित क्रांतीचं श्रेय प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांचं असताना नेहमीच इतरांच्या कामाचं श्रेय घेणारे इथले आमदार या कामाचं श्रेय घेण्याचं प्रयत्न करतात. स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यांच्या पाठा मऊ करण्याचं काम बिजवडीकर यापुढेही नक्की करतील, असा टोला शिवसेनेचे (Shiv Sena) उपजिल्हाप्रमुख संजय भोसले (Sanjay Bhosale) यांनी लगावला.

बिजवडी विकास सेवा सोसायटीतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Government) नवनिर्वाचित संचालकांच्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, राष्ट्रवादीचे युवा नेते मनोज पोळ, माजी उपसभापती तानाजी कट्टे, सुनिल पोळ, दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, विष्णूपंत अवघडे, सुदाम नारनवर, बाबूराव काटकर, शिवाजीराव महानवर, आनंदराव विरकर, रंगराव भोसले, जयप्रकाश कट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sanjay Bhosale

Sanjay Bhosale

हेही वाचा: 'Akhilesh Yadav औरंगजेब आहे; जो आपल्या बापाचा कधी होऊ शकला नाही, तर तो..'

प्रभाकर देशमुख म्हणाले, शरद पवार हे काय करतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे मंत्रीमंडळाचं बाशिंग बांधून बसलेल्यांवर टाळ्या वाजविण्याची वेळ आली, असा टोला त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला. ते पुढे म्हणाले, माढ्याच्या खासदारकीच्या काळात शरद पवार यांनी माण-खटाव साठी १७५ कोटी मंजूर करुन दिले होते. त्यामुळे शरद पवारांवर आरोप करून फसवणूक करणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. माण तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही प्रयत्न करु.

Prabhakar Deshmukh

Prabhakar Deshmukh

हेही वाचा: 'सेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी राष्ट्रवादीकडून कुटिल डाव'

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले म्हणाले, साखळी सिमेंट बंधाऱ्याचा पहिला प्रयोग लोधवडेत प्रभाकर देशमुख यांनी राबविला. त्यांच्याच कल्पकतेतून तो संपुर्ण माणमध्ये राबवला गेला. शरद पवार यांच्या सावलीत सुध्दा उभं राहण्यांची ज्यांची लायकी नाही ते विचारतात शरद पवार यांनी काय केलं? विध्वंसक वृत्तीला साथ द्यायची की विकासाची दृष्टी असलेल्या महाविकास आघाडीला साथ द्यायची हे ठरविण्याची वेळ आली आहे.

Web Title: Mahavikas Aghadi Leaders Ncp Shiv Sena Criticize Bjp Mla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..