esakal | सरनाईकांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर महाविकास आघाडीची मंगळवारी बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

सरनाईकांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर महाविकास आघाडीची मंगळवारी बैठक

सरनाईकांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर महाविकास आघाडीची मंगळवारी बैठक

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: महाविकास विकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल आहे, असं काही वातावरण नाहीये. काँग्रेसने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर आघाडी अंतर्गत असलेली धुसफूस आणखीनच वाढली आहे. काँग्रेसचा स्वबळाचा नारा, प्रताप सरनाईकांचं पत्र आणि त्यानंतर घडत असलेल्या घडामोडी या पार्श्वभूमीवर उद्या महाविकासआघाडीची बैठक होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे.

हेही वाचा: जुलै महिन्यात पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा; परीक्षा परिषदेकडून तयारी सुरू

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत आणि आपला पक्ष कमकुवत होत चालला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींशी जुळवून घेतलेले बरं होईल, असं पत्रात सरनाईक यांनी लिहिलं आहे.

काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर शिवसेनेकडून नाराजीचा सूर उमटला होता. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी आपल्या मनोगतात देखील याबाबत वक्तव्य केलं होतं. सामना मुखपत्राच्या अग्रलेखात देखील याबाबत लिहण्यात आलं होता. त्यानंतर लगेचच प्रताप सरनाईक यांचा 'लेटरबॉम्ब' यांमुळे महाविकास आघाडीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या बैठकीत महामंडळ वाटपासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा होणार आहे.

loading image
go to top