Mahavikas Aghadi: प्रकाश आंबेडकरांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा होणार; काँग्रेस प्रभारींचा हिरवा कंदील

Mahavikas Aghadi: प्रदीर्घ काळ चाललेला सस्पेंस संपवत काँग्रेस-शिवसेना (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) यांच्या महाविकास आघाडीने (MVA) प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील लोकसभा जागावाटप चर्चेत सामील होण्याचे मान्य केले.
mahavikas aghadi prakash ambedkar news in marathi-Maharashtra in-charge of Congress ramesh chennithala
mahavikas aghadi prakash ambedkar news in marathi-Maharashtra in-charge of Congress ramesh chennithala

Mahavikas Aghadi: प्रदीर्घ काळ चाललेला सस्पेंस संपवत काँग्रेस-शिवसेना (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) यांच्या महाविकास आघाडीने (MVA) प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील लोकसभा जागावाटप चर्चेत सामील होण्याचे मान्य केले. महाविकास आघाडीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांच्या स्वाक्षरी असलेले लेटरहेडवर आमंत्रण जारी केले आहे. दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. mahavikas aghadi

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विभागीय आढावा बैठक धुळे येथे पार पडली. उत्तर महाराष्ट्र विभागाचा आढावा 'द्वारकमाई बँक्वेट हॉल' धूळे येथे पार पडली. ही बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रमुख उपस्थितीती होती. mahavikas aghadi

"मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली असून काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांच्याशी जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत", अशी माहिती धुळे येथे पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.

mahavikas aghadi prakash ambedkar news in marathi-Maharashtra in-charge of Congress ramesh chennithala
IND vs ENG : अक्षरची चूक भारताला महागात पडणार? पोपचा शतकी धमाका अन् सामना गेला चौथ्या दिवसावर

नरीमन पॉइंट येथील एका खासगी हॉटेलमध्ये दुपारी ३ वाजता होणाऱ्या राज्याच्या ४८ लोकसभेच्या जागांसाठी जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आणि अंतिम रूप देण्यासाठी महाविकास आघाडीने चर्चेसाठी प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित केले आहे.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग होण्यास इच्छुक आहे. प्रकाश आंबेडकरांनी नुकतेच या मुद्द्यावर काँग्रेसला एक पत्र देखील लिहिले होते, ज्यात महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा इशारा दिला होता, ज्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांना धक्का बसला होता.

mahavikas aghadi prakash ambedkar news in marathi-Maharashtra in-charge of Congress ramesh chennithala
Manoj Jarange : ''अभिनंदन पण आरक्षण कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांना विचारा'', राज ठाकरेंचा जरांगेंना चिमटा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com