मंत्र्यांच्या निवासस्थानांचे नामकरण; आदित्य ठाकरेंच्या बंगल्याला 'रायगड' नाव I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्र्यांच्या निवासस्थानांचे नामकरण; आदित्य ठाकरेंच्या बंगल्याला 'रायगड' नाव

मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलं आहे.

मंत्र्यांच्या निवासस्थानांचे नामकरण; आदित्य ठाकरेंच्या बंगल्याला 'रायगड' नाव

राज्यीतल सर्वच दुकानात मराठी भाषेत फलक लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्यानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यांची नावसुद्धा बदलली जात आहेत. राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्यांची नावं देण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंत्र्यांचे बंगले गड-किल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत. राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता. या संदर्भात त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतीम मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांचं नामांतरण करण्यात आलं आहे.

यामध्ये मंत्री उदय सामंत यांचा बंगला आता रत्नसिंधू या नावावे ओळखला जाणार असून मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्याला रायगड या नावाने संबोधले जाणार आहे. शिवप्रेमींनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावाला सकारात्मक पाठपुरावा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असं नामांतर करण्यात आलं आहे.

हेही वाचा: 'जोरदार धडक झाली, मोठ्ठा आवाज आला...'; बिकानेर रेल्वे दुर्घटनेचा थरार

नविन नाव अशी असतील -

 • अ-३ शिवगड

 • अ-४ राजगड

 • अ-५ प्रतापगड

 • अ-६ रायगड

 • अ-९ लोहगड

 • ब-१ सिंहगड

 • ब-२ रत्नसिंधू

 • ब-३ जंजिरा

 • ब-४ पावनगड

 • ब-५ विजयदूर्ग

 • ब-६ सिध्दगड

 • ब-७ पन्हाळगड

 • क-१ सुवर्णगड

 • क-२ ब्रम्हागिरी

 • क-३ पुरंदर

 • क-४ शिवालय

 • क-५ अजिंक्यतारा

 • क-६ प्रचितगड

 • क-७ जयगड

 • क-८ विशाळगड

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top