esakal | ZP Election 2021 : पालघर 'ZP'वर महाविकास आघाडीची सत्ता कायम; पण, काँग्रेसला खातं उघडण्यात अपयश
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीचा झेंडा

पालघर 'ZP'वर महाविकास आघाडीची सत्ता कायम; पण, काँग्रेसला खातं उघडण्यात अपयश

sakal_logo
By
संदीप पंडीत

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या (palghar zp election result 2021) आज झालेल्या पोट निवडणुकीत आज मतमोजणी घेण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडीची (mahavikas aghadi) सत्ता अबाधित असून राष्ट्रवादीला काँग्रेसला चार जागा, सेनेला पाच जागा मिळाल्या आहेत. तसेच भाजपने चार जागांवर विजय मिळविला आहे. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला खातंच उघडता आलं नाही.

हेही वाचा: सहा 'ZP'त भाजपला २३, तर महाविकास आघाडीचा ४६ जागांवर विजय

हेही वाचा: ZP Election 2021 : नागपुरात सुनील केदारांनी गड राखला, भाजपला मोठा धक्का

पालघर जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून या निवडणुकीत भले सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले असले तरी सध्या पालघर जिल्हापरिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आली. या निवडणुकीतील घटक पक्षाच्या विजयाने येथील सत्तेवर महाविकास आघाडीने घट्ट पाय रोवले आहेत. या निवडणुकीत काही धक्कादायक निकालही लागले असून त्यात शिवसेनेने आणि खासदार राजेंद्र गावित यांनी प्रतिष्ठेची केलेल्या मुलाची जागा पडल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे, तर निवडणूक मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपच्या उमेदवाराने शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यानंतरही केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मतदार संघातील गारगावची जागा राष्ट्रवादीने जिंकली. या निवडणुकीत डहाणू मतदार संघात भाजपने चांगलीच मुसंडी मारली, तर पालघरमध्ये शिवसेनेने आपला गड राखला आहे, असे म्हणावे लागेल.

पालघर जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाला किती जागा? -

  • शिवसेना - ५

  • भाजप - ४

  • राष्ट्रवादी - ४

  • माकप १

  • अपक्ष १

  • एकूण - १५

पालघर जिल्हा परिषद निकाल (१५ जागा)

१) बोर्डी - ज्योती पाटील भाजप

२) कासा - लतिका वालजी राष्ट्रवादी काँग्रेस

३) वणई - पंकज कोरे भाजप

४) सरावली - सुनील ,माच्छी भाजप

५) ओलांडे - संदीप तावडे भाजप

६) नांदोरे देवखोप- नीता पाटील शिवसेना

७) सावरे एम्बुरे - विनया कोरे शिवसेना

८) आसे - हबीब शेख अपक्ष

९) पोशेरा- सारिका निकम शिवसेना

१०) आंबिटघर - भक्ती वल्टे राष्ट्रवादी

११) गारगाव - रोहिणी शेलार राष्ट्रवादी

१२) मोज - अरुण ठाकरे शिवसेना

१३) मांडा - अरुण चौधरी राष्ट्रवादी

१४) पळसई - मिताली बागुल शिवसेना

१५) उधवा - अक्षय दवणे माकप

loading image
go to top