Mahavitaran News : वीज आयोगाकडून महावितरणला झटका, दहा टक्के दरकपात मंजूर; ग्राहकांना मोठा दिलासा
ElectricityTariff : वीज नियामक आयोगाने २०२२-२३ ते २०२४-२५ आणि २०२५-२६ ते २०२९-३० या वीज दर नियमनाच्या कालावधीत महावितरणला महसुली तूट मंजूर करत मोठा झटका दिला.
मुंबई : बहुवार्षिक वीजदर निश्चितीअंतर्गत २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांतील महसुली तूट आणि २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांसाठी आवश्यक असलेल्या महसुलाला मंजुरी देताना वीज नियामक आयोगाने ‘महावितरण’ला जोरदार झटका दिला आहे.