मुंबई - राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्षांनी सोयीचे राजकारण अवलंबल्याचे चित्र आहे. आगामी काळात शहरात ‘दोस्ती’ आणि ग्रामीण भागात ‘कुस्ती’ असे नवे राजकीय पॅटर्न पाहायला मिळणार आहे. .महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे युती टिकवणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असले तरी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मात्र जागावाटपाचा मोठा पेच निर्माण होणार आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी ग्रामीण भागात स्थानिक आघाड्या करून निवडणुका लढवण्याला प्राधान्य दिले जाईल, असे सूतोवाच युतीमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने केले आहे..राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत अपवाद वगळता महायुतीने साथ-साथचा नारा दिला आहे. विरोधकांना लाभ होऊ नये यासाठी, प्रसंगी सामंजस्य आणि काही प्रमाणात नुकसान सहन करूनही युती म्हणूनच निवडणूक लढण्यावर नेत्यांचा भर आहे.अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत स्थानिक पातळीवर टोकाचे मतभेद असतानाही, ते बाजूला सारून एकत्र निवडणुकीसाठी उच्चस्तरीय प्रयत्न सुरू आहेत. महापालिका निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाण्यास प्रभाग रचनाही अनुकूल ठरताना दिसत आहे..बहुसदस्यीय पद्धतीत विजय सुकर?मुंबई वगळता उर्वरित २८ महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय पद्धत असून, एका प्रभागातून दोन ते पाच उमेदवार निवडून द्यायचे आहेत. या रचनेमुळे युतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी एक जागा देऊन समन्वय साधणे शक्य होणार आहे. यामुळे ज्यामुळे मित्रपक्षांतील संभाव्य वाद आणि कार्यकर्त्यांची नाराजी टाळून विजयाचे गणित सुकर होईल, असा विश्वास युतीच्या नेत्यांना आहे..ग्रामीण भागात स्थानिक आघाडीजिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यातून प्रत्येकी एकच उमेदवार निवडून द्यावा लागतो. अशा वेळी एका जागेवर युतीमधील तिन्ही पक्षांचे प्रबळ उमेदवार असल्यास ती जागा नेमकी कुणाला द्यायची, हा मोठा प्रश्न आहे. एखादी जागा मित्रपक्षाला सोडल्यास इतर दोन पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये बंडाची शक्यता असल्याने राज्याची युती लादण्याऐवजी स्थानिक आघाडीवर भर दिला जाणार आहे..आघाडीसाठी युतीतील पक्षांनाच प्राधान्य‘जिथे समन्वय शक्य नाही, तिथे स्थानिक पातळीवर अपक्ष किंवा विकास आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल. अशी आघाडी करताना शक्यतो युतीतील घटक पक्षांनाच प्रथम प्राधान्य दिले जाईल. ग्रामीण भागातील निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक वर्चस्वावर अवलंबून असल्याने ग्रामीण भागात मैत्रीपूर्ण लढत किंवा स्थानिक आघाडी हाच पर्याय प्रबळ राहील,’ असे युतीतील एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.