
राज्याच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. नागपूरच्या राजभवनात मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या यंदाच्या सरकारमध्ये 21 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र काही अनुभवी नेत्यांचाही पत्ता कट झाला आहे. अनेक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी इच्छा होती. अनेक आमदारांच्या मंत्रिपदाची चर्चा होती पण, अनेकांचा पत्ता कट झाल्याने बरेच जण नाराज झाले. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे.