
महाराष्ट्रातील ड्रग्ज व्यापाराबाबत सरकारने मोठे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. विधानसभेत एक महत्त्वाची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात ड्रग्ज विक्रीत सहभागी असलेल्या आरोपींना वारंवार अटक होऊनही जामिनावर सोडण्यात आल्यास त्यांच्यावर आता मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागू केला जाईल. यासाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा केली जाईल.