

Mahayuti Government Fruit Vegetable Adulteration
ESakal
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उच्च दर्जाच्या फळे आणि भाजीपाल्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी राज्य सरकार आता सज्ज झाले आहे. राज्याचे विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांच्या मालात भेसळ करणारे आणि हानिकारक रसायनांचा वापर करणारे आता सरकारच्या रडारवर असतील.