Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Marathi compulsory in Maharashtra schools: दादा भुसेंनी राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य असल्याची घोषणा केली आहे. ज्या शाळांनी हे नियम पाळले नाहीत त्यांची मान्यता रद्द केली जाईल असे त्यांनी सांगितले.
Marathi compulsory in Maharashtra schools

Marathi compulsory in Maharashtra schools

ESakal

Updated on

Marathi Compulsory in Schools Maharashtra : महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही त्यांची मान्यता रद्द केली जाईल. शालेय शिक्षणमंत्र्यांनी मुंबईतील अनेक आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठीकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने प्रत्येक शाळेत मराठी शिकवणे अनिवार्य असल्याची भूमिका स्पष्ट केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com