

Money Lending Law
ESakal
महाराष्ट्र सरकारने राज्यात वाढणाऱ्या अनधिकृत सावकार आणि त्यांच्यामागे असलेल्या आंतरराष्ट्रीय अवयव तस्करी टोळ्यांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. बुधवारी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत घोषणा केली की, राज्य सरकार महाराष्ट्र मनी लेंडिंग (नियमन) कायदा २०१४ मध्ये सुधारणा करत आहे. जेणेकरून तो अधिक कडक होईल. चंद्रपूरमधील एका शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किडनी विकावी लागली. त्या घटनेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.