.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विधानसभेत ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. यात लाडकी बहीण योजनेसाठीही मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यावर २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता महायुतीचं सरकार येताच या योजनेसाठी तरतूदसुद्धा करण्यात आली आहे.