सोमेश्वरनगर - 2024-25 हंगामात ऊस उत्पादनात 354 लाख टनांची आणि साखर उताऱ्यात तब्बल 0.80 टक्क्यांची घट झाल्याने देशातील साखर उत्पादन 58 लाख टनांनी घसरले आहे. गतहंगामातील 315 लाख टनांच्या तुलनेत चालू हंगामात अवघे 257 लाख टन साखरनिर्मिती होणार आहे..हंगामाअखेर 48 ते 50 लाख टन शिल्लक साखरसाठा असेल असा अंदाज 'एनएफसीएसएफ'ने वर्तविला असून त्यामुळे साखरेचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे. साखर उद्योगासाठी हा दिलासा ठरणार आहे..राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (एनएफसीएसएफ) दिलेल्या माहितीनुसार 15 मेपर्यंत भारताचे साखर उत्पादन सुमारे 18 टक्क्यांनी कमी झाले आहे. गेल्या हंगामत 10.10 टक्के असलेला साखर उतारा चालू हंगामात 9.30 टक्क्यांपर्यंत खाली आला. याशिवाय ऊस गाळपही 2767.75 लाख टनापर्यंत घसरले आहे..ते गेल्या वर्षी 3122.61 लाख टन होते. यामुळे हंगामाअखेर एकूण साखरउत्पादन 261 लाख टन होईल. त्यामुळे नव्या हंगामासाठी शिल्लक साखरसाठा सुमारे 48-50 लाख टन असेल. तो ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सहज पुरेल इतपत आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात ऊस लागवड वाढल्याने आणि पावसाचा अंदाज चांगला असल्याने 2025-26 या हंगामात साखर उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे साखरेच्या किमती सध्या 3,880 ते 3,920 रुपये प्रतिक्विंटलच्या पातळीवर स्थिर आहेत. यामुळे संपूर्ण उद्योगात तरलतेत लक्षणीय वाढ झाली आहे..कारखान्यांना हंगामाच्या सहा महिन्यांत एकूण 1.01 लाख कोटी रुपयांच्या (90 टक्के) ऊस थकबाकीपैकी अंदाजे 91,000 कोटी रुपये अदा करता आले, अशी माहिती 'एनएफसीएसएफ'चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.चालू हंगामात 35 लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळेल असा अंदाज होता. प्रत्यक्ष 32 लाख टनच वळणार आहे. उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसेसपासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलच्या किंमतीत सुधारणा न झाल्यामुळे हे घडले आहे..युपी पुन्हा पुढेगतहंगामाच्या तुलनेत महाराष्ट्राचे साखरउत्पादन 29.25 लाख टनांनी घटून 80.95 लाख टन झाले, उत्तर प्रदेशचे 10.90 लाख टनांनी घटून 92.75 लाख टन झाले तर आणि कर्नाटकचेही 11 लाख टन घटून 40.40 लाख टन झाले. तीन वर्षांनी यूपी पुन्हा महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे. गुजरात आणि उत्तराखंडमध्ये साखर उत्पादनात मध्यम सुधारणा झाली तर तामिळनाडू, बिहार आणि आंध्रप्रदेशमध्ये घसरले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.