मुंबई : 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.35 वाजता मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. या स्फोटात सहा मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला, तर शंभराहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. तपासादरम्यान घटनास्थळी सापडलेली दुचाकी हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचं उघड झालं. या धक्कादायक निष्कर्षानंतर या प्रकरणात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय रायकर, स्वामी दयानंद पांडे, समीर कुलकर्णी आणि सतीश चतुर्वेदी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते.