शेतकरी आंदोलन घेणार मागे? आज सिंघू बॉर्डरवर संघटनांची बैठक

farmer protest
farmer protestesakal

पंजाब : आज (ता.१) दिल्लीच्या सिंधू सीमेवर 40 शेतकरी संघटनांची मोठी बैठक होणार आहे. अशातच शेतकरी आंदोलन मागे घेणार का? अशी चर्चा होत आहे. शेतकरी संघटनांची आज महत्त्वाची बैठक पार पडत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मी तिन्ही कृषी कायदे मागे घेतोय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) कृषी कायद्यांबाबत मोठी घोषणा केली होती. त्यावेळी जोपर्यंत कृषी कायदे घटनात्मक पद्धतीनं रद्द होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिलं असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.

शेतकरी संघटनांची आज महत्त्वाची बैठक

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आज दिल्लीच्या सिंधू सीमेवर 40 शेतकरी संघटनांची मोठी बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत शेतकरी आंदोलन मागे घेण्याबाबत आणि MSP समितीच्या स्थापनेबाबत चर्चा करण्यात येणार आहे. पंजाबमधील अनेक शेतकरी संघटना आंदोलनाच्या विजयानंतर संप मागे घेण्याच्या बाजूनं आहेत, तर एमएसपी कायदा आणि खटले मागे घेण्यासह इतर मागण्यांसाठी अनेक शेतकरी संघटनांचा संप सुरुच ठेवण्याचा निर्धार आहे. माघार घेणाऱ्या संघटना एकमत घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच रणनीती निश्चित करण्यासाठी शेतकरी संघटनांची आज महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

20-22 संघटनांचं आंदोलन मागे घेण्यावर एकमत

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 पैकी सुमारे 20-22 संघटनांचं आंदोलन मागे घेण्यावर एकमत झालं. तर सुमारे 8-10 संघटना उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, पंजाबचे जोगिंदर सिंह उग्राहान आणि हरियाणाचे सरवन सिंह पंढेर गुरनाम चधुनी यांसारखे मोठे शेतकरी नेते संप सुरु ठेवण्याच्या बाजूने आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर त्यांच्या संघटनेचे शेतकरी मोठ्या संख्येने ठाण मांडून आहेत.

farmer protest
Omicron - महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवे नियम

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिनही कृषी कायदे रद्द करणारं विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत सादर करण्यात आलं. तसेच दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केलं आहे. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवलं जाणार आहे.

मोदी सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांना सर्वात आधी विरोध पंजाबच्या शेतकऱ्यांनी केला होता. त्यांनीच आव्हान केल्यानंतर पंजाबसोबतच हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केलं होतं. देशाच्या राजधानीला शेतकरी संघटनांनी वेढा देण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर या शेतकऱ्यांना पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांनी पाठींबा दर्शवला होता. आंदोलनाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली आणि बळीराजाचा एल्गार संपूर्ण देशभरात पसरला.

farmer protest
अमेरिका - शाळेत १५ वर्षीय विद्यार्थ्याकडून गोळीबार; तिघांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com