Relationship: मित्रांना अनफ्रेंड करण्यास गर्लफ्रेंडचा नकार, बॉयफ्रेंडची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Instagram

Relationship: मित्रांना अनफ्रेंड करण्यास गर्लफ्रेंडचा नकार, बॉयफ्रेंडची आत्महत्या

नागपुरात एका 22 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी प्रियकराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र शरीर उचाराला साथ देत नसल्याने. त्याचा मृत्यू झाला आहे. मृत प्रियकराच्या कुटुंबीयांनी सांगितले की बऱ्याच दिवसांपासून तो डिप्रेशनमध्ये होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, रोहन सिंह कुटुंबासोबत रामनगरमध्ये राहत होता. त्याने रामदासपेठ परिसरातील दुर्गापूजा पंडाळा शेजारी विष प्राशन केले. त्यानंतर प्रकृती खालवल्यावर रोहनने शेजारी असलेल्या एका व्यक्तीला संपूर्ण घटना सांगितली. या प्रकरणाची माहिती मिळताच रोहनचा मोठा भाऊ वीरपाल सिंह घटनास्थळी पोहोचला.

हेही वाचा: RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवरून फडणवीस आक्रमक; पटोलेंवर सांतापले

रोहनला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला मृत घोषित केले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. रोहनने देवी पंडाळा जवळील त्याच्या मित्राला सांगितलेल्या प्रकारानुसार, मृत रोहनचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याची गर्लफ्रेंड इंस्टाग्रामवर आणखी काही मुलांना फॉलो करते होती.

यामुळे रोहन सतत टेंन्शनमध्ये राहत होता. तो वारंवार त्याच्या गर्लफ्रेंडा सांगत होता त्या मुलांना अनफॉलो कर. तरुणीने अनफॉलो करण्यास नकार दिल्याने रोहनने हे पावूल उचलले आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रोहनवर खूप कर्ज होते, त्या मुळे तो सतत टेन्शनमध्ये राहत होता.

टॅग्स :RelationsNagpurinstagram