आजारी मुलीला दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी बापाची धडपड; सजवली रुग्णालयातील खोली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजारी मुलीला दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी बापाची धडपड

राहुल वर्मा यांनी आपल्या आजारी मुलीला दिवाळी साजरा करता यावी, यासाठी ती असलेल्या खोलीला दिव्यांनी आणि लाईट माळांनी सजवलं आहे.

आजारी मुलीला दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी बापाची धडपड

एका वडिलांसाठी त्यांची मुलं सर्वकाही असतात. मुलांच्या हितासाठी त्यांचे वडील आपल्यापरीनं जितकं अधिक करता येईल तितकं करत असतात. त्यासाठी कितीही मेहनत घ्यायची त्यांची तयारी असते. आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या अशाच एका पित्यानं आपल्या कृतीने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळीच्या शुभप्रसंगी वर्मांनी आपल्या मुलीसाठी केलेल्या या रोषणाईच नेटीझन्सकडून कौतुक केलं जातं.

संपूर्ण देशभरात सध्या दिवाळीची धामधूम सुरु आहे. सर्वत्र उत्साही वातावरण सुरु आहे. अशातच राहुल वर्मा यांच्या मुलीला डेंग्यू झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखलं केलं आहे. आधीच गतवर्षी कोरोनामुळे दिवाळी साजरा करता आली नव्हती आणि यंदा त्यांची मुलगी आजारी पडली. त्यामुळे आपल्या मुलीला यंदाचा दिवाळी सणाचा आनंद घेता यावा, यासाठी राहूल वर्मा हॉस्पिटलमध्येच दिवाळी साजरी करण्याचं ठरवलं. मुलगी हॉस्पिटलच्या ज्या रुममध्ये आहे, त्या रुमला त्यांनी दिवे आणि पणत्यांनी सजवलं.

राहुल वर्मा यांनी आपल्या डेंग्युने ग्रस्त मुलीच्या हॉस्पिटलच्या खोलीचा फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यांनी या अनोख्या दिपोत्सवाचे आणखी काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत त्यांनी आपल्या मुलीसाठी घेतलेले फुगे, मिठाई आणि चॉकलेट्सदेखील दाखवली आहेत. “मुलीला डेंग्यू झाला, मग आम्ही हॉस्पिटलच सजवून टाकलं. दिवाळीच्या शुभेच्छा,” असं कॅप्शन त्यांनी ट्विटला दिलं.

दुसर्‍या फोटोमध्ये त्यांनी लिहिले, "लक्षात ठेवा, लहान आनंदातही सर्वकाही असतं आणि आम्हाला सुंदर विचार करायला आवडतं."

या सुंदर पोस्टला 15000 हून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. लोकांनी राहुल यांची मुलगी लवकर बरी व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आणि या अनोख्या कृतीचं कौतुकही केले.

Web Title: Man Decorates Hospitals Room For Sick Daughter On Diwali Viral Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Diwali Festival
go to top