esakal | 'ही' असतील महाविकासआघाडी समोरची आव्हानं
sakal

बोलून बातमी शोधा

'ही' असतील महाविकासआघाडी समोरची आव्हानं
  • आता आव्हान सत्ता टिकवण्याचं 
  • किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचं आव्हान
  • केंद्राच्या असहकारालाही द्यावं लागेल तोंड

'ही' असतील महाविकासआघाडी समोरची आव्हानं

sakal_logo
By
अमोल कविटकर

महाविकासआघाडीचं सरकार येणं ही निव्वळ औपचारिकता राहिलीय. पुढची पाच वर्ष हे सरकार टिकवण्याचं आव्हान या नव्या आघाडीपुढे असेलच, मात्र केंद्राच्या असहकारालाही या सरकारला तोंड द्यावं लागणार आहे. 

होणार की नाही या शक्यतेच्या हिंदोळ्यावर असलेली महाविकासआघाडी अखेर  साकारल्यात जमा आहे. तिढा सुटला असला तरीही या सरकारसमोर आव्हान असेल ते सत्ता टिकवण्याचं. त्यासाठी आपल्या कामाची आणि व्यक्त होण्याची शैली या तिन्ही पक्षांना बदलावी लागेल. शिवाय आपला अजेंडाही काही काळासाठी बाजूला ठेवावा लागेल.

मंत्रिमंडळातलं नंबर दोनचं (गृहमंत्री) पद 'या' राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळणार?
 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यापुर्वी एकत्र काम करण्याचा अनुभव असला तरीही शिवसेनेसह काम केल्याचा या दोन्ही पक्षांचा इतिहास नाही. मात्र भाजपला सत्तेबाहेर ठेवायचं या समान हेतूसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येतायत.

आतील खबर : सत्ता स्थापनेसाठी आमदारांना 'या' वेळी येऊ शकतो मेसेज

या तिन्ही पक्षांनी निवडणुकीपुर्वी आपापल्या मतदारांना काही आश्वासनं दिली आहेत. ती सगळी आश्वासनं पुर्ण करायची झाल्यास शासकीय तिजोरीवर बोजा पडणार आहे. त्यामुळे यापैकी काही आश्वासनांवर प्रत्येक पक्षाला पाणी सोडावं लागेल. 


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, बच्चू कडूंना मंत्रीपदाची लॉटरी?
 

या सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान असेल ते केंद्र सरकारचं सहकार्य मिळवण्याचं. कारण ज्या भाजपला राज्यातल्या सत्तेबाहेर ठेवलं, त्याच भाजपचं केंद्रात सरकार आहे. त्यामुळे केंद्राकडून मिळणाऱ्या निधीला कात्री लागणार हे निश्चित आहे. पण यापुढे जावून केंद्राने या सरकारविरोधात असहकार पुकारल्यास महाविकासआघाडीच्या अडचणी वाढणार हे निश्चित.

म्हणूनच सत्ता स्थापनेनंतरचं पुढचं प्रत्येक पाऊल या सरकारला काळजीपुर्वक उचलावं लागेल.

Webtitle : what kind of care mahashivaghadi will have to take to work for five years successfully

loading image
go to top