परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थितीचे बंधन! महाविद्यालयांकडून विरोध अन्‌ बायोमेट्रिक हजेरीत शिथिलता; कुलगुरू म्हणाले, ‘मुले वर्गात यावीत, एवढाच उद्देश’

विद्यापीठाच्या वर्षात दोन सत्रांत ९० दिवसांच्या अंतराने परीक्षा होतात. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५ टक्के बंधनकारक आहे. आता संलग्नित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन घेतल्याची माहिती विद्यापीठाला द्यावी लागणार आहे. उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
Professors will now mark biometric attendance in class biometric attendance

Professors will now mark biometric attendance in class biometric attendance

sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : विद्यापीठाच्या वर्षात दोन सत्रांत ९० दिवसांच्या अंतराने परीक्षा होतात. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५ टक्के बंधनकारक आहे. आता संलग्नित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन घेतल्याची माहिती विद्यापीठाला द्यावी लागणार आहे. उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित ११५ महाविद्यालये आहेत. त्याअंतर्गत सुमारे ७० हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. कोरोनानंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेले बहुतेक विद्यार्थी प्राध्यापकांच्या तासाला वर्गात उपस्थित राहत नसल्याचे निरीक्षण विद्यापीठाने नोंदविले आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक असल्याचे आदेश काढले. त्याचबरोबर प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यासाठी मुदतही दिली होती. मात्र, ही बाब खर्चीक असून लगेच कार्यवाही होणार नाही, अशी भूमिका महाविद्यालयांनी घेतली. त्यानंतर विद्यापीठाने या निर्णयात शिथिलता आणली. आता परीक्षेवेळी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, एवढेच बंधन घालण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये उपस्थित राहावे हाच उद्देश

कोरोनानंतर उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये येऊन वर्गात बसून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्नित प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती ‘बायोमेट्रिक’द्वारे नोंदवावी, असा निर्णय आम्ही घेतला. जेणेकरून विद्यार्थी वर्गात येऊन शिकतील, हा त्यामागील हेतू आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये तशी सोय आहे; पण ज्यांच्याकडे नाही, त्यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती ‘बायोमेट्रिक’द्वारे नोंदवावी.

- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर

----------------------------------------

बायोमेट्रिक हजेरीला विरोध नाही, पण...

विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक उपस्थितीस आमचा विरोध नाही; पण ठरावीक कंपनीचेच सॉफ्टवेअर घ्या, याला विरोध आहे. महाविद्यालयांकडून विद्यापीठास विद्यार्थ्यांचे गुण पाठविले जातात. त्यावर विश्वास असतो. मग, महाविद्यालयांनी पाठविलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर का विश्वास नाही, असा प्रश्न आहे.

- नीता एस. मंकणी, सिनेट सदस्य

ठरावीक कंपनीचे बंधन ही अफवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक मशीनद्वारे नोंदवावी, असा निर्णय विद्यापीठाने घेतला. विद्यापीठाने तसा पत्रव्यवहारही महाविद्यालयांना केला आहे. मात्र, ठरावीक कंपनीचेच सॉफ्टवेअर बसविण्याचे बंधन घातल्याची अफवा होती. विद्यापीठाने तसे आदेशही दिलेले नाहीत. महाविद्यालयांनी कोणतेही सॉफ्टवेअर बसवावे; फक्त विद्यार्थी शिकण्यासाठी वर्गात उपस्थित राहावेत, एवढाच त्या निर्णयामागील उद्देश असल्याचे कुलगुरू डॉ. महानवर यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com