Mango in Winter : आता उन्हाळ्याची वाट पाहू नका, ऐन थंडीतच मिळतोय आंबा

लहानग्यांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचाच लाडका आंबा यंदा ऐन थंडीत म्हणजे नोव्हेंबर महिन्याच उपलब्ध झाला आहे.
Mango in Winter
Mango in Winteresakal

Mango in Winter : फळांचा राजा असणारा आंबा वर्षातून एकदाच मिळतो म्हणून सगळेच उन्हाळ्याची आतूरतेने वाट पाहत असतात. पण यंदा एवढी प्रतिक्षा करावी लागणार नाही. लहानग्यांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचाच लाडका आंबा यंदा ऐन थंडीत म्हणजे नोव्हेंबर महिन्याच उपलब्ध झाला आहे.

औरंगाबाद शहरातील शहानुर मिया दर्गा परिसरातील फळ विक्रेत्यांनी हंगाम बाह्य लालबागचा आंबा विक्रीसाठी आणला आहे. चवीला गोड आंबट तुरट असलेला हा आंबा ग्राहकांना भुरळ पाडत आहे.

Mango in Winter
Mango: बेळगावात फळांचा राजा दाखल

औरंगाबाद शहरातील फळ विक्रेत्यांनी शहरातील ग्राहकांसाठी बंगरुळ येथून हंगाम बाह्य लालबाग जातीचा आंबा विक्रीसाठी आणला आहे. या हंगाम बाह्य लालबाग आंब्याला जुलै, ऑगस्टमध्ये मोहर लागतो. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ते काढून घेतले जातात. लालबाग आणि निरंजन जातीचे आंबे वर्षातून दोन वेळा येतात दिवाळीनंतर बिगर हंगामी आंबा उपलब्ध होतो.

Mango in Winter
Raw Mango Facepack | टॅनिंग घालवण्यासाठी वापरा हा घरगुती फेसपॅक! | Sakal Media |

आंब्याचे वैशिष्ट्य

आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा दोनशे ग्रामचा आहे. चवीला गोड आंबट तुरट असा आंबा आहे. सध्या आंब्याच्ची आवक नसल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे या आंब्याची किंमत तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com