मुंबई - ‘माझ्या कार्यकाळात कृषी खात्यात नवनवीन बदल करण्याचा प्रयत्न केला. राज्यभर फिरून समस्या जाणून घेतल्या. त्यावर अधिक काम करायचे होते, मात्र खाते काढून घेतले. मी यावर नाराज नाही..मी खूष असून, दत्तात्रय भरणे यांना गरज पडल्यास सल्ला देईन,’ अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांना दिली. ‘शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकरीकेंद्रित कारभार करण्यावर माझा भर असेल. मंगळवारी कृषिमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहे,’ अशी माहिती भरणे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली..दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खातेबदलावर भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करूनच खातेबदल केले आहेत, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.नंदूरबार दौऱ्यावर निघालेले क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला..राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे बेशरम आणि लाचार आहे. विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचे सोडून त्यांना क्रीडा मंत्रालय देत त्यांचा उचित सन्मानच केला आहे. त्यामुळे आता मंत्री कोकाटे रमी या खेळाला ऑलिंपिक दर्जा देतील आणि तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही करतील.- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.कृषि मंत्रिपदाची मला ‘ऑफर’ होती - भुजबळनाशिक - ‘मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आधी मला कृषी खात्याची ऑफर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती,’ असा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केला. भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर कृषी खाते आपल्याकडे यावे यासाठी उपमुख्यमंत्री पवार आग्रही होते, असे भुजबळ यांनी सांगत कोकाटेंवर अप्रत्यक्ष टोला लगावला. कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी सोपविली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.