

Manikrao Kokate Controversy Timeline
esakal
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत रम्मी खेळताना आढळल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.
याआधीही त्यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेली वादग्रस्त वक्तव्ये आणि फसवणुकीच्या प्रकरणांमुळे त्यांच्यावर टीका झाली आहे.
विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती
Manikrao Kokate Resign: महाराष्ट्राचे माजी क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी काल बुधवारी संध्याकाळी उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला. १९९५ च्या गृहनिर्माण फसवणूक प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आला. आता ते रुग्णालयात आहेत. स्वत:ला आर्थिक दुर्बल दाखवून त्यांनी सदनिका लाटल्या होत्या. ३० वर्षानंतर या प्रकरणात कोर्टाने निकाल दिला आहे.
क्रीडा मंत्रालय आता अजित पवार यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. बुधवारी नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी सदनिकांच्या बेकायदेशीर संपादनाशी संबंधित प्रकरणात सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्री कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले.
माणिकराव कोकाटे यांची कारकिर्द नेहमी वादग्रस्त राहिली आहे. यापूर्वी त्यांचा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मोबाइलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते असलेल्या कोकाटे यांच्यावर विरोधकांनी शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलतेचा आरोप करत राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.