
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेच्या सभागृहात केवळ ४२ सेकंद नव्हे, तर १८ ते २२ मिनिटे ऑनलाइन रमी खेळत होते, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. विधिमंडळाच्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून कारवाई करावी, असे खुले आव्हानच पवार यांनी दिले.