Agriculture Minister Manikrao Kokate seen allegedly playing a game of Rummy inside the Maharashtra Assembly, as claimed by MLA Rohit Pawar in a viral tweet criticizing government inaction amid ongoing farmer suicides.
महाराष्ट्र बातम्या
Manikrao Kokate Video : शेतकरी दररोज जीवन संपवतोय अन् कृषिमंत्री विधिमंडळात पत्ते खेळताहेत; रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट
Manikrao Kokate Viral Video : रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवालही त्यांनी केला आहे.
राज्यात रोज शेतकरी आत्महत्या होत असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळण्यात मग्न असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी कृषीमंत्र्यांचा व्हिडिओच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.