सत्ता गेली की माणसं बिथरतात; मनीषा कायंदेंच्या निशाण्यावर भाजप

राज ठाकरे यांना हिंदुहृदय सम्राट म्हणणं हे राज ठाकरेंना तरी पटतंय का?
Manisha Kayande
Manisha KayandeEsakal

मुंबई: देशात कोरोना पसरण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचे वक्तव्य लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी केले होते. यामुळे काँग्रेसचे खासदार, आमदार व कार्यकर्ते चांगलेच आक्रामक झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याने नाराज झालेल्या काँग्रेसने भाजपच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांचे आंदोलनही सुरू आहेत. या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिला आहे.दरम्यान,शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे (Manisha Kayande)यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे.पोलिसांनी आज देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सुरक्षेसाठी पोलिस फौजफाटा तैनात केला होता. पण याचवेळी रक्षणकर्त्या महिला पोलीसांच्या हाताचा चावा भाजप महिला कार्यकर्त्याने घेतला. ही संस्कृती कुठली? ही भाजपची संस्कृती आहे का, ही भाजपा अटलजींची भाजपा आहे का असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आह. सत्ता गेली की इतकं माणसाने बिथरावं ? नेमकी काय मानसिकता आहे ?असं पुन्हा कोणी करू नये, कराल तर याद राखा शिवसेना पोलिसांच्या पाठशी आहे असा इशारा मनीषा कायंदे यांनी दिला.

Manisha Kayande
PM मोदींनी नाही, काँग्रेसनं देशाची माफी मागावी - फडणवीस

पुढे त्या म्हणाल्या,माननीय हिंदुहृदय सम्राट ही पदवी बाळासाहेबांना जनतेने उत्स्फूर्तपणे प्रेमाने आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे दिली. निवडणुकीत हिंदू शब्द वापरला तसा प्रचार केल्यामुळे ६ वर्ष बाळासाहेबांचा निवडणुकीचा अधिकार काढून घेतला होता. राज ठाकरे यांनी असं काय आजवर केलंय? राज ठाकरे यांना हिंदुहृदय सम्राट म्हणणं हे राज ठाकरेंना तरी पटतंय का? अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com