Manisha Kayande : सुषमा अंधारेंमुळेच मनिषा कायंदेंनी पक्ष सोडला? म्हणाल्या, देवी बसली म्हणणाऱ्यांचं...

Manisha Kayande
Manisha Kayandeesakal
Updated on

मुंबईः ठाकरे गटात्या नेत्या तथा विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत मनातील खदखद व्यक्त केली.

रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान आमदार मनिषा कायंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांना कायंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन शिवसेनेमध्ये स्वागत केला.

Manisha Kayande
Prakash Ambedkar : ''निजामानेही बाबासाहेब आंबेडकरांना आमिष दाखवलं होतं…'', औरंगजेबच्या कबरीवरुन फडणवीस थेट बोलले

यावेळी बोलतांना कायंदे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत आणि ओरिजनल शिवसेना आहे. इमाने-इतबारे मी मागच्या शिवसेनेत काम केलं. पक्षाची भूमिका मी भक्कमपणे मांडली. परंतु मागच्या वर्षभरात काहीही ऐकूण घेतलं जात नव्हतं.

एकनाथ शिंदे यांनी मला नेहमीच साथ दिली होती. शिंदे-फडणवीसांचं सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. हे सरकार गतिमान सरकार आहे. कामाचा झपाटा खूप आहे. तीन-तीन वर्षे थांबलेले प्रोजेक्ट या सरकारमुळे मार्गी लागलेले आहेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Manisha Kayande
गोफण| ऐका हो ऐकाSS.. कोण जास्त लोकप्रिय?

'देवतांचा अपमान करणाऱ्यांना टीव्हीवर बघावं लागतं'

पुढे बोलतांना मनिषा कायंदे म्हणाल्या की, एक वर्षात उद्धव ठाकरेंनी पक्षाची पुनर्बांधणी करायला पाहिजे होती, लोक पक्ष सोडून का चालले आहेत, यावर विचार करायला पाहिजे होता. परंतु तसं झालं नाही.

सकाळी उठून थुकरटवाडी बघायला लोक चॅनेल लावत नाहीत. देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांचं आणि देवी बसली, असं म्हणून देवीचा अवमान करणाऱ्यांचं आता टीव्हीवर ऐकावं लागत आहे. ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, खरी शिवसेना इथे आहे असं कायंदे म्हणाल्या. त्यांच्या बोलण्याचा रोख सुषमा अंधारे यांच्याकडे असल्याचं स्पष्ट होत आहे.

''ते म्हणाले कचरा निघून जात आहे, जावू द्या. मी माजी पर्यावरण मंत्र्यांना सांगते, कचऱ्यातून वीज निर्मिती होते असते. सकाळी उठून काँग्रेस-राष्ट्रवादीचा अजेंडा चालवायचा, हे मला आवडत नाही'' असं थेट भाष्य त्यांनी केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.