
Chandrashekhar Bawankule: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी जीआर काढला आहे. या शासन निर्णयाला सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांनी विरोध केला. त्यानंतर राज्य सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली. त्या माध्यमातून ओबीसींच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.