
Maharashtra Politics: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. आज जरांगे पाटील यांनी नियोजित सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली असून राज्यातील मराठा समाजातील लोकांनी आंतरवली सराटीत जमण्याचे आवाहन केले आहे. नवीन सरकार स्थापन होताच पुन्हा मराठा आरक्षणाची लढाई सुरु करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी याआधीच सांगितले होते. त्यानुसार त्यांनी 25 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे जाहीर केले आहे.