
मुंबई : ‘‘मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करतो. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करा. मुंबईतील रस्ते तत्काळ रिकामे करा. गोंधळ करणाऱ्यांनी घरी जावे. मात्र मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मी उठणार नाही,’’ असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. तसेच, मराठा व कुणबी एकच असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.