मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे वाढवणार धनगर समाजाची ताकद! दसरा मेळाव्याला लावणार हजेरी

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे मेळाव्याचे अध्यक्ष आहेत, तर माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, दत्तात्रय भरणे आणि राम शिंदे या मेळ्याव्याच उद्घाटन करतील.
मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे वाढवणार धनगर समाजाची ताकद! दसरा मेळाव्याला लावणार हजेरी

Dhangar Reservation:चौंडीमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला होता. यावेळी हे उपोषण थांबवताना राज्य सरकारने ५० दिवसांच्या आत अंमलबजावणी करण्याचं आश्वासन यशवंत सेनेले दिले होते, त्याचबरोबर तसं लेखी पत्रही देण्यात आलं होतं. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा करत सरकारच लक्ष वेधून घेण्यासाठी धनगर समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे यांनी माहिती दिली. यावेळी मनोज जरांगे हेदेखील उपस्थित असतील अशी माहिती त्यांनी दिली.

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे मेळाव्याचे अध्यक्ष आहेत, तर माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, दत्तात्रय भरणे आणि राम शिंदे या मेळ्याव्याच उद्घाटन करतील. धनगर समाजाचे माजी, आजी आमदार, खासदार , संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

यावेळी यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष दांगडे म्हणाले की, " महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत 17ते18 प्नमाण असलेल्या धनगर समाजाचा राज्यघटनेनुसार अनु.जमाती प्रवर्गात समावेश आहे. परंतु मागील 70 वर्षांपासून सर्वच सरकारांनी धनगर समाजाला घटनात्मक आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. याच मागणीसाठी 6सप्टेंबर ते 26 सप्टेंबर असे 21 दिवस संघटनेचे पदाधिकारी आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर यांनी पोषण चौंडी येथे प्राणांतिक उपोषण केले.त्याची दखल घेत धनगर आरक्षण अंमलबजावणी 50 दिवसात करण्याचे लेखी पत्र संघटनेला दिले."

पुढे ते म्हणाले की, " मात्र,शासनाने दिलेल्या मुदतीतील 30 दिवस उलटल्यानंतरही राज्य शासन पातळीवर आरक्षण अमलबजावणी संदर्भात कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे धनगर समाजात तीव्र असंतोष आहे.झोपलेल्या राज्य शासनाला जागे करण्यासाठी इशारादिला जाईल व पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. या मेळाव्यासाठी मराठा समाज आरक्षण आंदोलनकर्ते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आवर्जून हजेरी लावणार आहेत." (Latest Marathi News)

मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे वाढवणार धनगर समाजाची ताकद! दसरा मेळाव्याला लावणार हजेरी
Dasara Melava: दसऱ्याच्या मुहूर्तावर आज महाशक्तिप्रदर्शन, चार मेळाव्यांमध्ये धडाडणार तोफा; कोण काय बोलणार याकडे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com