
Maratha quota leader Manoj Jarange warns government to issue Kunbi certificates by September 17 or face strong opposition during the Dussehra rally at Narayangad.
हैद्राबाद गॅझेटियर प्रमाणे १७ सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही झाली पाहिजे. नाहीतर नारायण गडावरील दसरा मेळाव्यात आम्हाला सरकारच्या विरोधात मोठी भूमिका घ्यावी लागणार आहे, असा इशारच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. यानंतर ते नारायणगडावर जाणार आहेत. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.