

Manoj Jarange Patil announces another agitation over pending Maratha reservation demands, with 58 lakh Kunbi records and certificate implementation at the centre of the issue.
esakal
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यांनी नऊपेक्षा अधिक वेळा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारत सरकारवर दबाव आणला. मागण्या मान्य झाल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा जरांगेंचा दावा आहे. विशेषतः कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या प्रशासकीय अडचणींमुळे त्यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला.