
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा मुंबई गाठली आहे. ते लाखो मराठा आंदोलकांसह शुक्रवारी पहाटे मुंबईत पोहोचले असून थोड्यात वेळात ते आझाद मैदानात पोहोचणार आहेत. आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान चेंबूर येथे सना मलिक यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.