manoj jarange
manoj jarangemaratha reservation

Maratha Reservation : ''हे मान्य नाही, पुढच्या आंदोलनाची दिशा...'' मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केली भूमिका

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारं विधेयक विधीमंडळात मांडलं जाणार असल्याची माहिती आहे.
Published on

अंतरवाली सराटीः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारं विधेयक विधीमंडळात मांडलं जाणार असल्याची माहिती आहे.

एकीकडे राज्य सरकारने स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलावलेलं असलं तरी दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्वतंत्र आरक्षणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे, स्वतंत्र आरक्षण नको. कारण ते टिकेल की नाही याची शाश्वती नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

manoj jarange
Maratha Reservation: मराठा समाज मागासच, अहवाल राज्य सरकारकडून मंजूर; 10 टक्के आरक्षणाची शिफारस

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला सगेसोयऱ्याचं आरक्षण पाहिजे. त्यासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. नाहीतर पुढील आंदोलनाची दिशा उद्या निश्चित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आज मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय झाला तर उद्या पुन्हा मनोज जरांगे पाटील पुढील आंदोलनाचा इशारा देणार आहेत. त्यामुळे आजच्या अधिवेसनाच्या माध्यमातून सरकारने चालवलेला खटाटोप कामी येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

महाराष्ट्रात मराठा समाज किती?

मराठा समाज हा राज्यभरात २८ टक्के असल्याचे माजी न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला मागासवर्गीय आयोगाला आढळून आले आहे. सुमारे ५२ टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत. त्यामुळे राज्यातील २८ टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे योग्य ठरणार नाही, अशी माहिती आयोगाने अहवालात दिल्याचं पुढे येतंय.

manoj jarange
CIBIL Score: उद्योग मंत्री नारायण राणे ट्रोल होत असलेला सिबिल स्कोर नेमका काय आहे? तुम्हाला माहितेय का?

मराठ्यांना १० टक्के आरक्षणाची शिफारस?

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या अहवालात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवण्यात आले आहे. त्यानुसार, समाजाला १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता हा अहवाल विधिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com