CIBIL Score: उद्योग मंत्री नारायण राणे ट्रोल होत असलेला सिबिल स्कोर नेमका काय आहे? तुम्हाला माहितेय का?

What is Cibil Score: केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हीडिओ X वर पोस्ट केला. या व्हीडिओमध्ये पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला की CIBIL score मुळे नॅशनॅलाइज बँका कर्ज रिजेक्ट करतात.
What is CIBIL score trolled by Minister Narayan Rane
What is CIBIL score trolled by Minister Narayan RaneSakal

What is Cibil Score: केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हीडिओ X वर पोस्ट केला. या व्हीडिओमध्ये पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला की CIBIL score मुळे नॅशनॅलाइज बँका कर्ज रिजेक्ट करतात. (What is CIBIL SCORE Narayan Ranes new VIDEO shared by Anjali Damania)

मात्र सिबिल स्कोर म्हणजे काय हेच नारायण राणेंना माहिती नाही असं अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. तुम्हाला CIBIL score म्हणजे काय हे माहित आहे का? तो कशासाठी गरजेचा असतो? जाणून घेऊया.

सिबिल स्कोर म्हणजे काय? (what is cibil score)

CIBIL म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड, याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या सीबील किंवा क्रेडिट स्कोरची नोंद ठेवली जाते. जेव्हा तुम्ही कोणत्याही कर्जासाठी, वित्त किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँक प्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासते. (what is cibil score by narayan rane)

CIBIL स्कोअर कर्ज मंजूरी मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. एक चांगला CIBIL स्कोअर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम योग्य दराने मिळवण्यात मदत करू शकतो. CIBIL स्कोअर तपासणे आता खूप सोपे झाले आहे. आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे एका मिनिटात ते सहज तपासू शकता.

What is CIBIL score trolled by Minister Narayan Rane
China Recession: जपान ब्रिटननंतर चीनवरही मंदीचे ढग? जागतिक आर्थिक मंदीचा भारतावर परिणाम होणार का?

सिबिल स्कोअरला क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात. CIBIL स्कोअर पाहून, बँका ठरवतात की एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही. CIBIL स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान आहे. साधारणपणे, CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक चांगला मानला जातो.

CIBIL स्कोर ही तीन अंकी संख्या आहे. तो 300 ते 900 पर्यंत असतो आणि एखाद्या व्यक्तीची कर्ज घेण्याची क्षमता दर्शवतो. जेव्हा कोणी नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतो तेव्हा कर्ज देणारी संस्था अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासते आणि त्याला कर्ज देण्याच्या जोखमीचे मूल्यांकन करते आणि नंतरच कर्ज देते.

What is CIBIL score trolled by Minister Narayan Rane
Tata Group: एक कंपनी अख्ख्या पाकिस्तानपेक्षा भारी! टाटांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला टाकले मागे

सीबील स्कोर कसा मोजला जातो?

कर्जदाराने आत्तापर्यंत किती कर्ज घेतले आहे. त्याने ते कर्ज बँकेला परत केले आहे का? याची सविस्तर माहिती सीबील रिपोर्टमध्ये असते. यासाठी कर्जदाराचे गेल्या 36 महिन्यांचे क्रेडिट प्रोफाईल तपासले जाते. क्रेडिट प्रोफाइलमध्ये गृह कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड, ओवरड्राफ्ट सुविधा यांवरील कर्ज आणि पेमेंट हिस्ट्री यांचा समावेश असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com