
मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला की सातारा गॅझेटियर लागू न केल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.
त्यांनी ओबीसींसाठी उपसमितीचे समर्थन करत दलित, मुस्लिम, शेतकरी, आदिवासी आणि मायक्रो ओबीसींसाठीही उपसमित्या करण्याची मागणी केली.
जरांगे यांनी आरोप फेटाळत सांगितले की ते फक्त मराठा समाजासाठी लढत आहेत आणि आरक्षण मिळवून देण्यास खंबीर आहेत.
सरकारने मनोज जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर त्यांना सोपविण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. इतर मागण्यांची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असे त्यांना आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान आज त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील रुग्णालयात पत्रकार परिषदेत घेत सरकारला इशार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्या मी खंबीर असून सातारा गॅझेटियरल लागू केले नाही तर रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.